( चिपळूण )
चिपळूण तालुक्यात बुधवारी दुपारी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. आज दुपारी सुमारे २:१७ वाजता आलेल्या या धक्क्याची तीव्रता रिश्टर स्केलवर २.७ इतकी नोंदवण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या भूकंपाचा केंद्रबिंदू तालुक्यातील येगाव परिसरात जमिनीखाली होता. तीव्रता कमी असल्याने कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याची माहिती नाही.
अचानक आलेल्या धक्क्यामुळे काही क्षण नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र परिस्थिती लवकरच नियंत्रणात आली. प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहण्याचे आवाहन केले असून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे.


