(देवळे / प्रकाश चाळके)
सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या देवरुख येथील सौ. भारती जयंत राजवाडे यांना राज्यस्तरीय ‘नारी शक्ती पुरस्कार २०२६’ प्रदान करून गौरविण्यात आले. राजेश चौगुले फाउंडेशन, अंकलखोप (ता. पलूस) यांच्या वतीने आयोजित या सोहळ्यात त्यांचा सन्मान करण्यात आला.
शुक्रवार, १७ एप्रिल २०२६ रोजी बसवेश्वर चौक येथील ग्रामपंचायत पटांगणात हा दिमाखदार कार्यक्रम उत्साहात पार पडला. राज्यभरातून प्राप्त झालेल्या प्रस्तावांची छाननी करून, सामाजिक क्षेत्रातील निस्वार्थ योगदानाची दखल घेत सौ. राजवाडे यांची निवड करण्यात आली.
या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते त्यांना मानाची शाल, श्रीफळ, सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला ममताताई सिंधुताई सपकाळ (प्रकल्प संचालक, बालसंगोपन शिक्षण संस्था), शुभदा जोशी, भारती सुनील कोळी (गटशिक्षण अधिकारी, जल जीवन मिशन विभाग), रत्नप्रभा दबडे (विस्तार अधिकारी, कोल्हापूर), समीक्षा लक्ष्मण पाटील (सरपंच), अश्विनी अमोल साळुंखे (सरपंच) आणि राजेश्वरी शशिकांत सावंत आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फाउंडेशनच्या सौ. शीतल राजेश चौगुले होत्या. सोहळ्याचे नियोजन संस्थेच्या कार्यकर्त्यांनी उत्तमरीत्या पार पाडले. यावेळी परिसरातील सरपंच, ग्रामस्थ आणि फाउंडेशनचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

