(गावखडी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील श्री क्षेत्र गावखडी येथील श्री स्वामी समर्थ मठाच्या वतीने अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थांच्या पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. श्री स्वामी समर्थांच्या कृपेने तसेच गुरुमाऊली गुरुदेव दास दिगंबर महाराज यांच्या आशीर्वादाने ही पालखी गुरुवार, दिनांक २३ एप्रिल २०२६ रोजी सकाळी साडेदहा वाजता राजापूर तालुक्यातील कशेळी येथे आगमन करणार आहे.
पालखी दर्शनासाठी सकाळी ११ ते सायंकाळी ४.३० या वेळेत भाविकांना संधी उपलब्ध राहणार आहे. यावेळी स्वामी नामाचा गजर, महाआरती तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या पवित्र सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक श्री नंदकुमार फोडकर, विश्वास फोडकर आणि गुरुनाथ फोडकर यांनी केले आहे.

