(रत्नागिरी)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कोतवडे जिल्हा परिषद गटातील तरुण, तडफदार व कार्यतत्पर उमेदवार श्री. नितीश कृष्णा गैमार यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे श्री गणेशाचे आशीर्वाद घेऊन करण्यात आला.
या वेळी मनसे तालुका अध्यक्ष श्री. रुपेश जाधव, जिल्हा परिषद गटाचे लोकप्रिय उमेदवार श्री. नितीश गैमार, विभाग अध्यक्ष श्री. पिंट्या गवाणकर, श्री. अक्षय मोरे, श्री. सत्यविजय खाडे यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, संबंधित जिल्हा परिषद क्षेत्रातील सर्व पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गणपतीपुळे येथील श्री गणेशाच्या दर्शनाने प्रचाराला सुरुवात करत मनसेने या निवडणुकीसाठी सज्ज असल्याचा संदेश दिला. कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून आगामी काळात प्रचार अधिक जोमाने राबवण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

