(तरवळ / अमित जाधव)
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र (रत्नागिरी विभाग) यांच्या वतीने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश भगवान सांबरे यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त मंगळवार, दिनांक २१ एप्रिल २०२६ रोजी तरवळ (कोल्हेनगर) येथे भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
ही संस्था रत्नागिरी तालुक्यातील गोरगरीब व सर्वसामान्य नागरिकांसाठी सातत्याने कार्यरत असून, आरोग्य सुविधा सर्वांपर्यंत पोहोचाव्यात या उद्देशाने मोफत रुग्णालयाच्या माध्यमातून सेवा दिली जात आहे. त्याच उपक्रमाचा एक भाग म्हणून हे शिबिर आयोजित करण्यात येत आहे.
या शिबिरात जनरल आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटप, रक्तदाब व शुगर तपासणी, तज्ज्ञांचे मार्गदर्शन तसेच मोफत औषधांचे वाटप करण्यात येणार आहे. परिसरातील नागरिकांना एकाच ठिकाणी विविध आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचा हा प्रयत्न आहे.
या उपक्रमाचा लाभ तरवळ व परिसरातील सर्व नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन संस्थेचे सचिव केदार चव्हाण, जिल्हाध्यक्ष ॲड. महेंद्र मांडवकर, तालुकाध्यक्ष मंदार नैकर आणि खालगाव विभाग प्रमुख सचिन गोताड यांनी केले आहे.

