(रत्नागिरी)
रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, शीळ येथील विद्यार्थ्यांनी सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत शाळेचा लौकिक उंचावला आहे. इयत्ता तिसरीतील कुमार युग गणेश वाडकर याने संपूर्ण रत्नागिरी तालुक्यात पाचवा क्रमांक मिळवत गोल्ड मेडल पटकावले.
याशिवाय इयत्ता तिसरीतील मिश्री अमोल सनगरे हिने ब्राँझ मेडल, तर इयत्ता सहावीतील कुमारी तनिष्का बंडू बसरे हिने सिल्व्हर मेडल मिळवले. तसेच देवांग किशोर पवार, सौम्या कमलेश पाटील, अनन्या सत्यराज पवार (इयत्ता तिसरी), कु. विधी विजय मोहिते (इयत्ता दुसरी) आणि कु. आस्था कमलेश पाटील (इयत्ता सहावी) यांनीही उल्लेखनीय यश मिळवले. ही परीक्षा जानेवारी २०२६ मध्ये घेण्यात आली होती.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. ज्ञानेश वाडकर व सदस्यांनी अभिनंदन केले. तसेच श्री. विजय देसाई, श्री. संदीप नाचणकर, शुभम कदम, विनायक कदम, प्रसन्न करंदीकर (अजय) यांनी विद्यार्थ्यांना विशेष बक्षिसे देऊन गौरव केला.
केंद्रप्रमुख सौ. मेघा कांबळे (मिरजोळे), मुख्याध्यापक श्री. मकसूद सय्यद, मार्गदर्शिका सौ. स्मितांजली जाधव, सौ. वृषाली नाचणकर, उपशिक्षिका श्रीमती अर्चना वारकरी तसेच देसाईबाई, सर्व शिक्षकवृंद, पालक, ग्रामस्थ आणि माजी विद्यार्थी संघ, शीळ यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालय, साळवी स्टॉप, रत्नागिरी येथे श्री संदेश सावंत (संस्थापक अध्यक्ष, युवा संदेश प्रतिष्ठान) यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षीस वितरण समारंभ उत्साहात पार पडला.

