(राजापूर / तुषार पाचलकर)
राजापूर तालुक्यातील सावडाव–हातदे येथे मंगळवार, दि. १४ एप्रिल २०२६ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त भव्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. राजापूर तालुका बौद्धजन संघ (रजि.) गट क्रमांक ४ (मुंबई व ग्रामीण) तसेच सावडाव–हातदे बौद्ध विकास मंडळ आणि माता रमाई महिला मंडळ (मुंबई व ग्रामीण) यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होणार आहे.
सकाळी ९.३० वाजता धम्मध्वजारोहणाने कार्यक्रमाची सुरुवात होईल. त्यानंतर सकाळी १० ते ११ या वेळेत बुद्धपूजापाठ आयोजित करण्यात आला आहे. दुपारी ११ ते १ दरम्यान स्थानिक मंडळांकडून विविध सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रम सादर केले जाणार आहेत.
सायंकाळी ५ वाजता डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून, सायंकाळी ७ वाजता बुद्धपूजापाठ होईल. सायंकाळी ७.३० वाजता जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले असून, सभेच्या अध्यक्षस्थानी अनंत सिताराम जाधव राहणार आहेत.
या सभेत प्रमुख वक्ते म्हणून आशिष अ. जाधव सर मार्गदर्शन करणार असून “डॉ. बाबासाहेब आंबेडकर समजून घेताना” या विषयावर ते विचार मांडणार आहेत. रात्री ९.३० वाजता भोजदान कार्यक्रम होईल. त्यानंतर रात्री १०.३० वाजता तुषार पाचलकर प्रस्तुत “भीमाई” हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला जाणार आहे.
या कार्यक्रमासाठी विविध मान्यवरांची उपस्थिती अपेक्षित असून, परिसरातील सर्व भीमप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या उत्सवाचे आयोजन राजापूर तालुका बौद्धजन संघ, सावडाव–हातदे बौद्ध विकास मंडळ आणि माता रमाई महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी सौ. किर्ती योगेश आयरे (सरपंच ग्रा. पं. मिळंद-सावहाव), आयु, विश्वनाथ पाटकर (सरपंच-ग्रा.पं. हालदे) आणि सौ. दिपाली मंगेश चव्हाण (पोलीस पाटील हातदे) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या कार्यक्रमासाठी विविध मान्यवरांची उपस्थिती अपेक्षित असून, परिसरातील सर्व भीमप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
राजापूर तालुका बौद्धजन संघ (रजि.) गट क्रमांक ४ मुंबईचे आयु, जयवंत सोनु कांबळे (अध्यक्ष), आयु, प्रकाश राहू कांबळे (उपाध्यक्ष), आयु, विनय हरिशचंद्र शिर्के (सचिव), आयु, स्वप्नील मिलिंद कांबळे (सहसचिव), आयु, राजेंद्र जाधव (सहसचिव), आयु, भौतम यशवंत कांबळे (खजिनदार), आयु, जनार्दन महादेव कांबळे (सहखजिनदार), आयु, विलास हरी कांबळे (गट प्रतिनिधी), आयु, रविंद्र बाबजी गुरव (उपसरपंच ग्रा.पं. मिळंद-सावडाव), आयु, जयप्रकाश अंबाजी चव्हाण (उपसरपंच-हातदे), आयु, निलेश बाबाजी राणे (पोलीस पाटील मिळंद-सावडाव) तसेच राजापूर तालुका बौद्धजन संघ (रजि.) गट क्रमांक ४ ग्रामीण कार्यकारणीचे आयु. अनंत सिताराम जाधव (अध्यक्ष), आयु, प्रकाश यशवंत आजिवलकर (उपाध्यक्ष), आयु. विकास गणपत कदम (सहअपाध्यक्ष), आयु, संदेश शंकर शिर्के (सचिव) तसेच गाव प्रतिनिधी आयु. शरद जनार्दन कांबळे (सहसचिव), आयु. राजेंद्र काशिराम कांबळे (सहसचिव), आयु, सयाजी कृष्णा पवार (खजिनदार), आयु. प्रकाश जानू कांबळे (गट प्रतिनिधी), श्री साई डिजीटल फचल 8552092020 संदिप धोंडू जाधव, प्रशांत विजय जाधव, रविंद्र गंगाराम शिर्के, सुभाष सिताराम कांबळे, विश्वास तानाजी कांबळे, यशवंत राघो कांबळे, केशव धर्माजी कांबळे, सिद्धार्थ विठ्ठल कदम, सिद्धार्थ लक्ष्मण कांबळे, प्रकाश हरी जाधव, रघुनाथ तानाजी जाधव, गणेश सुरेश मोरे, साबडाब, हातदे बौध्द विकास मंडळ मुंबईचे आयु. बाजेंद्रकुमार महादेव पवार (अध्यक्ष) आयु, जितेंद्र रघुनाथ जाधव (सचिव), माता स्माई महिला मंडळ मुंबईचे सौ. श्रद्धा सुजित जाधव (अध्यक्ष), सौ. तृषा तुषार जाधव (सचिव) सावडाव, हातदे बौध्द विकास मंडळ ग्रामीणचे आयु, प्रकाश जानु कांबळे (अध्यक्ष), आयु. सिद्धार्थ लक्ष्मण कांबळ (सचिव), आयु, जनार्दन विठु जाधव (जेष्ठ सल्लागार), आयु, रघुनाथ तानाजी जाधव (जेष्ठ सल्लागार), सौ. प्रणाली प्रकाश कांबळे (अध्यक्ष), सौ. प्रिती प्रकाश जाधव (सचिव), आयु, श्रीधर शिवराम कांबळे (सल्लागार), माता रमाई महिला मंडळ मुंबई, तसेच व्यवस्थापक सावडाव, हातदे बौद्ध विकास मंडळ व माता रमाई महिला मंडळ मुंबई / ग्रामीण आदी मान्यवर या कार्यक्रमासाठी मेहनत घेत आहेत.

