(राजापूर / तुषार पाचलकर)
राजापूर तालुक्यातील पाचल गावचे सुपुत्र समीर खानविलकर यांची भारतीय जनता पार्टीच्या राजापूर पूर्व मंडळ तालुका सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राजापूर येथे झालेल्या कार्यक्रमात विधानपरिषदेचे आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
समीर खानविलकर यांनी गेली अनेक वर्षे भाजप व खासदार नारायण राणे यांचे समर्थक म्हणून पाचल परिसरासह संपूर्ण तालुक्यात विविध सामाजिक व पक्षीय उपक्रम राबवले आहेत. विशेष म्हणजे, कोणत्याही राजकीय पदाधिकारी किंवा नेत्याकडून आर्थिक मदत न घेता पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी त्यांनी सातत्याने कार्य केले आहे.
त्यांच्या या निष्ठावान व प्रामाणिक कार्याची दखल घेत राजापूर पूर्व तालुकाध्यक्ष अॅड. एकनाथ सिताराम मोंडे यांनी त्यांची तालुका सरचिटणीसपदी निवड केली आहे. नियुक्तीनंतर भाजप कार्यकर्त्यांकडून समीर खानविलकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
पत्रात अॅड. एकनाथ मोंडे यांनी खानविलकर यांचे पक्षातील योगदानाचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

