(देवळे / प्रकाश चाळके)
संगमेश्वर तालुक्यातील देवळे–जंगलवाडी येथील ग्रामदैवत श्री देव रवळनाथ मंदिराचा पाचवा वर्धापन दिन चैत्र कृष्ण त्रयोदशी (शिवरात्री) निमित्त मंगळवार, दि. १५ एप्रिल २०२६ रोजी उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.
या वर्धापन दिनानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ८.०० वाजल्यापासून मंत्रजप, अभिषेक, सत्यनारायण महापूजा, त्यानंतर महाप्रसाद तसेच स्थानिक भजनांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या धार्मिक सोहळ्याचा लाभ देवळे–जंगलवाडी पंचक्रोशीतील सर्व भाविक व ग्रामस्थांनी घ्यावा, असे आवाहन श्री देवी कालेश्वरी–रवळनाथ मंदिर ट्रस्ट, देवळे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

