( संगमेश्वर/ प्रतिनिधी )
कुणबी शिक्षण प्रसारक मंडळ संगमेश्वर, कुणबी समाज संघटना संगमेश्वर, कुणबी समाजोन्नतीसंघ संगमेश्वर, कुणबी युवा संघटना संगमेश्वर,कुणबी सेना, बळीराजा सेना, साडेबहात्तर खेडी संघटना या सर्व संघटनांची रविवारी १ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी कडवई येथील विजय कुवलेकर यांच्या ग्राऊंडवर बैठक पार पडली.
या बैठकीला संगमेश्वर तालुक्यातील कुणबी समजाचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. सुरुवातीस कुणबी भवन बांधकमाचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकी मध्ये आपल्या समाजाचा उमेदवार असावा अशी सर्वानुमते मागणी करण्यात आली. या सभेत रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोष थेराडे या यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. सर्व संघटनाच्या सभासदांनी एक मताने कुणबी समाजाच्या न्याय हक्कासाठी आपल्या समाजाचा आपला हक्काचा माणूस भावी आमदार संतोषजी थेराडे यांनाच आपण संघटनेच्या माध्यमातून भरघोस मताधिक्याने निवडून देऊ असा निर्धार करण्यात आला.
संतोष थेराडे यांची संगमेश्वर व चिपळूण तालुक्यात चांगली पकड आहे. पंचायत समिती सदस्य ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अशी वाटचाल करताना त्यांनी विकासाची अनेक कामे तडीस नेली आहेत. गोरगरिबांच्या अडीअडचणीच्या काळात ते नेहमी धावून जात असतात त्यामुळे त्यांच्या सारख्या हुशार व कर्तबगार व्यक्तिमत्त्वाला आमदारकी मिळाल्यास तळागाळातील लोकांचे प्रश्न ते नक्कीच सोडवतील असा विश्वास समाजात आहे.येत्या निवडणुकीत त्यांना आमदार बनवायचेच असा निर्धार या मीटिंगमध्ये करण्यात आला.कुणबी समाज ६५ टक्के असताना आपल्याच समाजाचा प्रतिनिधी व्हावा अशी संपूर्ण समाजाने मागणी केली.
सभेसाठी बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष सुरेश भायजे, साहेब जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोष थेराडे, साडे बहात्तर खेड्याचे अध्यक्ष श्री दत्ताराम लांबे,कडवई गावचे उपसरपच दत्ताराम ओकटे, शंकर बोले,सुरेश कांगणे,आंबेडचे सरपंच चंद्रकांत फणसे,आरवली गावचे सरपंच निलेश भुवड,मनोहर किंजळकर , प्रदिप कानाल, कृष्णा मेने, दत्ताराम लाखन, विजय कुवळेकर, प्रकाश घडशी,सुशिल भायजे, संतोष चांदे,सुनिल गेल्ये रामचंद्र हरेकर,संतोष भडवळकर, संतोष मुंडेकर ,बाळकृष्ण काष्टे आदी पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.