(देवळे / प्रकाश चाळके)
संगमेश्वर तालुक्यातील देवळे येथे श्री काडसिद्धेश्वर गुरुभक्त मंडळ देवळे विभागातर्फे परमपूज्य समर्थ सद्गुरु श्री काडसिद्धेश्वर स्वामी महाराज यांचा अध्यात्म सत्संग आनंद सोहळा शुक्रवार दिनांक 10 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे. सदर सोहळा 49 वे मठाधिपती श्री सिद्धगिरी संस्थान मठ कणेरी कोल्हापूर यांचे मंगल उपस्थित होणार आहे. अमृततुल्य प्रवचनाचा व दर्शनाचा लाभ भक्त मंडळींनी घ्यावा असे आग्रहाचे निमंत्रण श्री काडसिद्धेश्वर गुरु भक्त मंडळ देवळे विभागा तर्फे कळविण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला शुक्रवारी सायंकाळी 5.00 वाजता सांप्रदायिक भजन 7.00 वाजता श्री स्वामी महाराजांचे प्रवचन आरती व महाप्रसाद असे आयोजन केले आहे. अध्यात्म सत्संग आनंद सोहळा देवळे येथील प्रसिद्ध श्री खडगेश्वर मंदिर देवळे बाजारपेठ येथे होणार आहे. याची भक्त मंडळींनी नोंद घ्यावी असे देवळे विभाग भक्तगणाने म्हटले आहे. अधिक माहितीसाठी भाऊ धामणस्कर मो.8390454576 सुरेश गार्डन 9923095175 यांच्याशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.

