(रत्नागिरी / प्रतिनिधी)
भारतीय घटनेचे निर्माते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५व्या जयंतीनिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव समिती रत्नागिरी यांच्या वतीने आयोजित भीम जयंती महोत्सव २०२६ अंतर्गत विविध सामाजिक उपक्रमांना उत्साहात प्रारंभ झाला आहे. समाजाभिमुख कार्यातून जयंती उत्सवाला विधायक दिशा देण्याचा प्रयत्न समितीच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
महोत्सवाच्या नियोजनानुसार ७ एप्रिल रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास रिमांड होम रत्नागिरी येथे फळवाटप कार्यक्रम पार पडला. यावेळी समितीचे अध्यक्ष अनंत सावंत यांनी तेथील मुलांशी संवाद साधत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा परिचय करून दिला आणि त्यांच्या विचारांची प्रेरणा मुलांपर्यंत पोहोचवली. यानंतर आधार बेघर निवारा केंद्र येथे, जेनगरपरिषद संचालित केंद्र आहे, तेथेही फळवाटप करण्यात आले. या उपक्रमातून निराधार घटकांप्रती सामाजिक बांधिलकी अधोरेखित करण्यात आली.
दिवसभरातील उपक्रमांचा समारोप शासकीय प्रतिभा महिला वस्तीगृह येथे फळवाटपाने झाला. समाजातील विविध घटकांशी संवाद साधत कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्याचा संदेश या माध्यमातून देण्यात आला.
या प्रसंगी अनंत विठ्ठल सावंत, शिवराम विठ्ठल कदम, तुषार भार्गव जाधव, दिपक सिताराम जाधव, सुनिल जयराम पवार, अजित जाधव, राहुल पवार, विजय जाधव, विरश्री बेटकर, सुनिल आंबूलकर, निखिल सावंत, दिवेन कांबळे, केतन पवार, रुपेश कांबळे, संजय कांबळे यांच्यासह अन्य कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.

