(संगमेश्वर/ प्रतिनिधी)
पारंपरिक रूढींना फाटा देत पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक प्रबोधनाचा संदेश देणारे उत्तरकार्य सत्यशोधक पद्धतीने पार पडले. निसर्गवासी शिवराम गोपाळ भायजे यांचे उत्तरकार्य रविवार, २३ ऑगस्ट रोजी सत्यशोधक पद्धतीने करण्यात आले. या वेळी अस्थींचे नदी अथवा जलाशयात विसर्जन न करता वृक्षारोपण करून अस्थी झाडाच्या बुंध्याशी ठेवण्याचा पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात आला.
शिवराम भायजे यांचे सुपुत्र गणपत भायजे तसेच कन्या सुरेखा कळंबटे, प्रणाली गावडे आणि संजना काजरेकर यांनी हे उत्तरकार्य केले. ‘कोकणचे गाडगेबाबा’ म्हणून ओळखले जाणारे प्रबोधनकार मारुती काका जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली हा विधी पार पडला. उत्तरकार्याच्या निमित्ताने घराजवळ खड्डा खोदून विविध झाडांची लागवड करण्यात आली. त्यानंतर अस्थी पाण्यात विसर्जित करण्याऐवजी त्या झाडांच्या बुंध्याशी ठेवण्यात आल्या. अस्थी विसर्जनाऐवजी वृक्षारोपण, पर्यावरणाचे जतन आणि सत्यशोधक विचारांचा अंगीकार असा त्रिसूत्री संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
या परिवर्तनशील उपक्रमासाठी भायजे कुटुंबीय, भगिनी, नातेवाईक आणि समाजबांधवांनी उत्स्फूर्त सहकार्य केले. उत्तरकार्याला बहुजन विकास आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश भायजे, ॳॅड संदिप ढवळ, दिपक चव्हाण, प्रदिप चव्हाण, अशोक ताम्हणकर, वसंत नागले, नारायण भुरवणे, मदन खळे, शंकर लाड, बी. टी. झोरे, अशोक भाटकर, विकास पेजे, मिलिंद कडवईकर, चंद्रकांत कांबळे, प्रशांत कीर, बाबू गुडेकर, कृष्णाजी कोकमकर, संजय जिनगरे, दत्ताराम भुवड, विकास सडके, अमोल लाड, रामचंद्र घाणेकर, अनंत जोशी, सरपंच दिनेश कांबळे, उपसरपंच अनंत बसवणकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
याशिवाय पांडुरंग भातडे, अर्जुन बावडेकर, लक्ष्मण पितळे, रामचंद हतपले, शांताराम कांबळे, प्रकाश कांबळे, सखाराम कांबळे, पांडुरंग कांबळे, शंकर शिदम, संतोष वास्कर, महेंद्र घाणेकर, संजय भुवड, सुहासिनी भुवड, संजय गार्डी, वाडीप्रमुख योगेश गावडे, रवींद्र खाडे, कडवई आरोग्य विभाग, रेवाळे-जुवळे कुणबी पतपेढी देवरूख, गोताड, शैलेश करवंजे, कृष्णा काजरेकर, साळवी, संजय काजरेकर, विठोबा भायजे, कीर्ती भायजे, संतोष भायजे, रामचंद भायजे, प्रकाश भायजे तसेच नातेवाईक, मित्रपरिवार आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमासाठी जय हनुमान मित्र मंडळ, पिंपळवाडी-चोरवणे तसेच महिला मंडळानेही मोलाचे सहकार्य केले. उत्तरकार्याला उपस्थित मान्यवरांचे स्वागत आणि सन्मान करताना त्यांना पुस्तक आणि रोपटे भेट देण्यात आले. पुस्तकाच्या माध्यमातून वैचारिक प्रबोधनाची, तर रोपट्याच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाची प्रेरणा देण्याचा अभिनव प्रयत्न यावेळी करण्यात आला. पारंपरिक उत्तरकार्याला सामाजिक आणि पर्यावरणीय जाणिवेची जोड देत ‘अस्थी विसर्जनाऐवजी वृक्षारोपण’ हा विचार कृतीत उतरविण्यात आला. त्यामुळे श्रद्धेला पर्यावरण संवर्धनाची आणि स्मृतीला वृक्षाच्या रूपाने चिरस्थायी करण्याची सकारात्मक दिशा या उपक्रमातून मिळाली.

