(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर तालुक्यातील कसबा भेंडीबाजार येथील प्राजक्ता प्रतीक पाटेकर ही 25 वर्षीय महिला 9 एप्रिल रोजी घरात कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेली होती. तिचा नातेवाईकांसह सर्वत्र शोध कुटुंबियांनी घेऊनही ती न सापडल्याने व तपास न लागल्याने प्राजक्ताचा पती प्रतीक पाटेकर याने संगमेश्वर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.
प्राजक्ता प्रतीक पाटेकर ही विवाहिता 9 एप्रिल रोजी सकाळी 11.30 वाजताच्या दरम्यान घरातील कुटुंबियांना कोणतीही कल्पना न देता घरातून निघून गेली होती. ती घरात नाही, हे कुटुंबियांच्या लक्षात आल्यावर त्यांनी आजूबाजूला परिसरात व नातेवाईकांच्याकडे तपास केला असता तीचा काहीच पत्ता न लागल्याने तीचा पती प्रतीक पाटेकर याने संगमेश्वर पोलीस ठाणे गाठून तीची पत्नी प्राजक्ता बेपत्ता असल्याची फिर्याद दाखल केली होती.
संगमेश्वर पोलिसांनी तत्परता दाखवत, पोलीस उप अधिक्षक शिवप्रसाद पारवे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्र फिरवून बेपत्ता प्राजक्ता पाटेकर हिचा शोध घेण्यास सुरु केला आणि काही दिवसातच शोध मोहिमेला यश प्राप्त झाले. बेपत्ता प्राजक्ता ही मुंबई मालाड येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळताच संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रशांत शिंदे, पोलीस हेडकॉन्सटेबल सचिन कामेरकर यांनी त्या ठिकाणी पोहचून प्राजक्ता हिला ताब्यात घेतले. तिला संगमेश्वर येथे आणून पुढील कार्यवाही करून पतीच्या ताब्यात दिले. संगमेश्वर पोलिसांच्या यशस्वी कामगिरीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
दरम्यान, घरात पती प्रतीक याच्याबरोबर पटत नसल्याने काम करण्यासाठी मुबंई मालाड येथे घरात कोणालाही न सांगता गेल्याची माहिती प्राजक्ता हिने पोलिसांनी दिली.