( देवरूख / प्रतिनिधी )
नामदेव समाजोन्नत्ती रत्नागिरी जिल्हा कार्यकारणी आणि चिपळूण तालुका नामदेव शिंपी समाज यांची सभा चिपळूण येथील श्री संत नामदेव मंदिर येथे राज्याचे उपाध्यक्ष अनंत टमके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली
सचिव सचिन हेंद्रे यांनी मागील सभेचे इतिवृत वाचून मंजुरी घेतली. तसेच खजिनदार संदीप वेल्हाळ यांनी सर्वांना नासपचे सदस्य होण्यासंदर्भात आवाहन केले. त्यानंतर प्रामुख्याने 22 तारखेला नागपूर येथे होणाऱ्या विश्व् संमेलनाबद्दल श्रीमती उषाताई पोरे व अभय नाझरे यांनी मार्गदर्शन केले. तसेच जिल्हा कार्याध्यक्ष अनिल सदरे यांनी विश्व् संमेलनात सर्व शिंपी समाजातील पोटजाती एकत्र येऊन आपले देशपातळीवरील प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न केले जाणार असलेबाबतचे मार्गदर्शन केले
श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांची नोंद सरकारी दप्तरी होऊन त्यांचा संजीवन समाधी सोहळा हा सरकारी कार्यक्रम म्हणून घोषणा होणे हे विश्व् संमेलनाचे एक मोठे उद्दिष्ट आहे, तसेच पारंपारिक टेलरिंगचा व्यवसाय जो आज बंद होत चाललाय त्याला राजश्रय मिळणे गरजेचे आहे असे जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय भस्मे यांनी सांगितले. यासह काही मागण्यांसाठी या संमेलनात मोठया प्रमाणात सहभागी होणे संदर्भात नियोजन करण्यात आले आहे.
सभेचे अध्यक्ष राज्य उपाध्यक्ष अनंत टमके यांनी रत्नागिरी जिल्ह्यात समाज बांधव एकत्र येत आहे आणि आपल्या अस्तित्वाची जाणीव होत आहे, याबद्दल समाधान व्यक्त केले चिपळूण तालुका अध्यक्ष जगदीश आवले यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि जिल्हा सदस्य श्रीमती प्रणिता कपडेकर यांनी आभार मानून सभेची सांगता करण्यात आली.

