(संगमेश्वर)
संगमेश्वर तालुक्यातील आरवली येथील साईलवाडीमधील हनुमान मित्र मंडळाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त आणि हनुमान जयंतीच्या औचित्याने १ एप्रिल २०२६ रोजी राज्यस्तरीय भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला स्पर्धकांसह प्रेक्षकांकडूनही उत्स्फूर्त आणि भरघोस प्रतिसाद मिळाला.
या स्पर्धेत सुमारे ३५ स्पर्धकांनी सहभाग घेत स्पर्धेची रंगत अधिकच वाढवली. परीक्षक म्हणून नामांकित कोरिओग्राफर योगेश मोहिते, अपूर्वा थत्ते आणि सचितानंद शिर्के यांनी अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने परीक्षणाची जबाबदारी पार पाडली.
स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे:
प्रथम क्रमांक: श्राव्या पाटणकर (ठाणे)
द्वितीय क्रमांक: शुभ्रा गांगण व कृपा सुद
तृतीय क्रमांक: शाम मालदार (चिपळूण) व सुंदर जाधव (लांजा)
चतुर्थ क्रमांक: नेत्रा आंबेकर (राजापूर)
पाचवा क्रमांक: सृष्टी मेस्त्री (डेरवण) व पार्थ पारकर (चिपळूण)
स्पर्धेत विजयी झालेल्या सर्व स्पर्धकांचे मंडळाच्या वतीने कौतुक करण्यात आले तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाचा एकूणच उत्साहपूर्ण आणि संस्मरणीय वातावरणात समारोप झाला.

