(गावखडी / वार्ताहर)
भर पावसात रत्नागिरीत हापूस आंबा कलमांना मोहर आल्याने आंबा बागायतदार धास्तावले आहेत. सध्या श्रावण महिना सुरू आहे सर्वत्र व्रतवैकल्ये साजरी केली जात आहेत अशाच या श्रावण महिन्यामध्ये ऊन पावसाची उघडीप चालू आहे अशा या वातावरणात आंबा कलमांना मोहर आलेला आहे आंबा कलमांना आलेला मोहर पाहून आंबा बागायतदार आश्चर्यचकित झालेले आहेत.
भर पावसात आंबा कलमांना मोहोर आल्याने रत्नागिरीमध्ये अनेक ठिकाणी आंबा बागायतदारांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. सध्या आंबा बागायतदार आंबा कलमांना टाळमाती करणे त्याचप्रमाणे आपले भात शेती करणे यामध्ये येथील शेतकरी वर्ग कामांमध्ये मग्न आहे. मात्र रत्नागिरीत आंबा कलमांना आलेल्या मोहोराने अनेक जण आश्चर्य व्यक्त करीत आहेत.
(छायाचित्र: दिनेश पेटकर, गावखडी)

