( संगमेश्वर / प्रतिनिधी )
जय हनुमान मित्र मंडळ, सोनवडे (वरचीवाडी) यांच्या वतीने प्रतिवर्षा प्रमाणे गुरुवार दि. ०२ एप्रिल २०२६ रोजी हनुमान जयंती उत्सव सोनवडे हायस्कूल येथे साजरा होत आहे. सदर कार्यक्रमास भाविकांनी मोठया संख्येने उपस्थिती राहावे असे आवाहन उत्सव समितीने केले आहे.
हनुमान जयंती निमित्त आयोजित कार्यक्रम सकाळी ६.३३ वा. श्रींचा जन्मोत्सव, हनुमान स्तोत्र, हनुमान चालिसा पठण, सायं. ३ ते ५ वा. हळदी कुंकू, सायं. ७.०० वा. महाआरती, रात्रौ ८.०० वा. श्री स्वयंभू प्रासादिक भजन मंडळ पाटगाव बुवा प्रदिप लिंगायत
रात्रौ १०.०० वा. शिवराज कलामंच, रत्नागिरी प्रस्तुत श्री विराट विश्वकर्मा नाट्य नमन मंडळ, संगमेश्वर या सर्व कार्यक्रमांना भक्त मंडळींनी उपस्थित राहावे असे आवाहन मंडळाचे जय हनुमान मित्र मंडळ, अध्यक्ष सोनवडे (वरचीवाडी)यांनी केले आहे. हे सर्व कार्यक्रम माध्यमिक विद्यालय, सोनवडे (वरचीवाडी)येथे संपन्न होणार आहेत.

