(गुहागर)
मातोश्री लक्ष्मीबाई भाऊ हेदवकर विद्यानिकेतन, हेदवी येथे रविवार, दिनांक २९ मार्च २०२६ रोजी शालेय स्तरावरील माजी विद्यार्थी संघाची स्थापना करण्यात आली. या उपक्रमामुळे शाळा आणि माजी विद्यार्थ्यांमधील सुसंवाद अधिक बळकट होणार असून, विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांना चालना मिळणार आहे.
या वेळी संघाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. त्यानुसार अध्यक्षपदी श्री. अभय अशोक भाटकर यांची निवड करण्यात आली असून उपाध्यक्षपदी श्री. प्रकाश गणपत नाटेकर यांची निवड झाली. सचिव म्हणून मुख्याध्यापक श्रीकांत गजानन जोगळेकर यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे, तर कोषाध्यक्षपदी श्री. महादेव विश्राम वणे यांची निवड करण्यात आली.
तसेच सदस्य म्हणून श्री. संदीप प्रभाकर हळदणकर, श्री. सुनील अंबाजी जाधव, श्री. संजय शिवराम जाधव, श्री. प्रवीण हरिश्चंद्र हळदणकर, श्री. एकनाथ धाकू बसणकर, श्री. प्रदीप श्रीधर हळदणकर, श्री. शिवप्रसाद जगन्नाथ हळदणकर, श्री. अनंत पांडुरंग गावणंग आणि श्री. रमाकांत शंकर हेदवीकर यांचा समावेश करण्यात आला आहे. तर संघाच्या सल्लागार सदस्य म्हणून श्री. हेमंत दत्तात्रय खरे तसेच उपक्रमशील शिक्षक श्री. राजेश श्रीपती गायकवाड यांची निवड करण्यात आली.
या संघाच्या स्थापनेमुळे माजी विद्यार्थ्यांचे शाळेशी असलेले नाते अधिक दृढ होणार असून, शाळेच्या प्रगतीसाठी मोलाचे योगदान मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

