(रत्नागिरी)
शिव योगा क्लासेस व प्रायोजक राजेश सोहनी अँड कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने “Mr. Yogi and Miss Yogini” जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा 2026-27 उत्साहात पार पडली. या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यास आगाशे एम्पायरचे मालक श्री. अनंत मुकुंद आगाशे, स्पर्धेचे प्रायोजक श्री. राजेश रमेश सोहनी, राष्ट्रीय पंच श्री. रणवीर सावंत, डॉ. गौरव आंब्रे, योग प्रशिक्षक श्री. अशोक कुमठेकर, योग शिक्षक श्री. किरण संगरे, योग शिक्षिका सौ. श्रद्धा जोशी, कु. अपूर्वा मुसळे तसेच डॉ. सौ. कविता फासके यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
स्पर्धा चार वयोगटांमध्ये आणि दोन प्रकारांमध्ये आयोजित करण्यात आली होती. १० वर्षांखालील, ११ ते १४ वर्षे, १५ ते १८ वर्षे आणि १९ ते २५ वर्षे अशा गटांमध्ये मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये पारंपरिक योगासने तसेच ‘Mr. Yogi’ आणि ‘Miss Yogini’ या विशेष पुरस्कारांसाठी स्पर्धा पार पडली.
संपूर्ण जिल्ह्यातून सुमारे ७० स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
बक्षीस वितरण सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून उद्योग मंत्री नामदार उदय सामंत यांचे पी.ए. तथा श्री साई अनिरुद्ध एज्युकेशन सोसायटी, पाली (रत्नागिरी) चे उपाध्यक्ष श्री. महेश सामंत उपस्थित होते.
स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे:
१० वर्षांखालील मुली:
प्रथम – ईशा आशुतोष गुर्जर
द्वितीय – वीरा अमेय गांधी
तृतीय – अवनी जानकर
१० वर्षांखालील मुले:
प्रथम – आरुष अमोल पाटील
द्वितीय – शौर्य स्वराज मगदूम
तृतीय – दक्ष महेंद्रसिंग राणा
१४ वर्षांखालील मुली:
प्रथम – राधिका मंदार पेडणेकर
द्वितीय – दिया दिनकर सावर्डेकर
तृतीय – दुर्वा अमोल साळवी
१४ वर्षांखालील मुले:
प्रथम – आयुष विक्रांत पाटील
द्वितीय – स्वरूप मनोज खेराडे
तृतीय – सोहम विजय बंडबे
१८ वर्षांखालील मुली:
प्रथम – सलोनी अमर शिर्के
द्वितीय – श्रेया सविता तारे
१८ वर्षांखालील मुले:
प्रथम – प्रतीक पुरंदर पूजारी
द्वितीय – रत्नेश हितेश आडिवरेकर
तृतीय – स्पंदन गौरव धामणे
वरील सर्व गटांतील प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या स्पर्धकांमधून ‘Mr. Yogi’ आणि ‘Miss Yogini’ पुरस्कारांसाठी अंतिम निवड करण्यात आली. यामध्ये ‘Mr. Yogi’ हा मान प्रतीक पुरंदर पूजारी याने पटकावला, तर ‘Miss Yogini’ हा किताब राधिका मंदार पेडणेकर हिने जिंकला.
स्पर्धेचे आयोजन उत्कृष्ट पद्धतीने पार पडले असून, जिल्ह्यातील योगप्रेमींसाठी हा उपक्रम प्रेरणादायी ठरला.

