(राजापूर / तुषार पाचलकर)
राजापूर तालुक्यात सुमारे ३ हजार इतकी मुस्लिम समाजाची लोकसंख्या असलेल्या पाचल गावात रमजान ईद मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी लवकर मुस्लिम बांधवांनी उठून नमाजाची तयारी केली आणि मशिदीत जाऊन नमाज अदा केली.
नमाजानंतर एकमेकांना गळाभेट देत ‘ईद मुबारक’च्या शुभेच्छा देण्यात आल्या. (उर्दूमध्ये या गळाभेटीला ‘मौनका’ असे म्हणतात.) गावातील सर्व धर्मीयांनी एकमेकांना शुभेच्छा देत बंधुभाव जपल्याचे चित्र पाहायला मिळाले. यावेळी गरीब आणि गरजू व्यक्तींना धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. पाचलमधील चारही मशिदींमध्ये दिवसभर आनंद आणि उत्साहाचे वातावरण होते.
यावेळी राजापूर पोलीस उपनिरीक्षक श्री सुधीर उबाळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री.कमलाकर पाटील, पोलीस सहायक पो.कॉ. श्री.निलेश कात्रे, पो. कॉ. श्री.स्वप्नील घाटगे, होमगार्ड श्री.निलेश मौसमकर, श्री.रवींद्र ताम्हणकर यांनी देखील पोलीस प्रशासनाकडून मुस्लिम बांधवाना इदीच्या शुभेच्छा दिल्या.

