( राजापूर / तुषार पाचलकर )
सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्था मर्यादित यांच्या नव्या शाखेचे उद्घाटन रविवार, दि. २२ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता पाचल बाजारपेठेतील मांगरीष अपार्टमेंट येथे आयोजित करण्यात आले आहे. या शाखेचे उद्घाटन वैश्यवाणी समाज, रत्नागिरी जिल्ह्याचे अध्यक्ष विकास म. शेट्ये यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान गणपत वळंजू भूषवणार आहेत.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून वैश्यवाणी समाज पाचलचे अध्यक्ष किशोरभाई नारकर तसेच व्यापारी संघटना पाचलचे अध्यक्ष अण्णा पाथरे उपस्थित राहणार आहेत. याशिवाय मान्यवरांमध्ये बाबालाल फरास (सरपंच, पाचल ग्रामपंचायत), सिद्धाली मोरे (जिल्हा परिषद सदस्या), अपेक्षा मासये (पंचायत समिती सदस्य), समीक्षा वाफेलकर (पंचायत समिती सदस्या) तसेच आत्माराम सुतार (उपसरपंच, पाचल) यांची उपस्थिती लाभणार आहे.
उद्घाटन सोहळ्याच्या दिवशी सकाळी ८ वाजता सत्यनारायणाची पूजा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

