(गावखडी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील गावखडी येथील श्री स्वामी समर्थ मठात श्री स्वामी समर्थ प्रगट दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने तीन दिवस भक्तिमय वातावरणात पूजाविधी, नामजप, प्रवचन व पालखी सोहळा असे कार्यक्रम होणार आहेत.
दि. १९ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता मठामध्ये स्वामी नामज्योत प्रज्वलन करण्यात येणार आहे.
दि. २० मार्च २०२६ रोजी प्रगट दिनानिमित्त पहाटे ५.३० वाजता काकड आरती होईल. सकाळी ७ वाजता श्री स्वामी समर्थ पूजन व स्वामी पादुकांवर अभिषेक करण्यात येईल. त्यानंतर सकाळी १० वाजता सामुदायिक नामजप, १०.३० वाजता श्री स्वामी नामजप यज्ञ, दुपारी १२ वाजता सद्गुरू प्रवचन, दुपारी १२.३० वाजता महानैवेद्य अर्पण व महाआरती होईल. दुपारी १ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ७ वाजता मठाच्या प्रांगणात पालखी प्रदक्षिणा तर रात्री ८ वाजता नित्याची आरती होणार आहे.
दि. २१ मार्च २०२६ रोजी दुपारी १२ वाजता महानैवेद्य, महाआरती व महाप्रसाद होईल. त्यानंतर दुपारी ४ वाजता गावखडी मठ पालखी सोहळ्याला प्रारंभ होणार आहे.
या सर्व धार्मिक कार्यक्रमांचा लाभ भक्तांनी घ्यावा, असे आवाहन मठ व्यवस्थापनाकडून करण्यात आले आहे.

