(जाकादेवी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील जाकादेवी पंचक्रोशीतील युवा नेते भाजपाचे युवा तालुकाध्यक्ष पदावर कार्यरत असलेलले प्रतिक सुधीर देसाई यांची भाजपा रत्नागिरी (मध्य) तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार नारायण राणे, नितेश राणे, जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे. रत्नागिरी (मध्य) तालुकाध्यक्ष पदाच्या नियुक्ती प्रसंगी जाकादेवी येथे रामदास राणे, विजय चितळे, माजी जिल्हाध्यक्ष दत्ता देसाई, मिथुन निकम, तात्या काळे आदी उपस्थितीत होते.
प्रतिक देसाई यांनी यापूर्वी भाजपा युवा संघटनेचे अध्यक्ष भूषवले आहे. त्यांनी अतिशय कमी वयात सामाजिक कार्याला वाहून घेतले. एवढेच नव्हे तर राजकारणाच्या माध्यमातून त्यांनी मूलभूत अनेक लोकोपयोगी उल्लेखनीय कामे केली आहेत. त्यांच्या पाठी मोठे जनमत आहे. अनेक प्रसंगात ते लोकांना मदतीचा सढळ हस्ते हात देत आले आहेत. त्यांच्या विधायक व पक्षीय कामाची दखल घेऊन भाजपाने त्यांची तालुकाध्यक्षपदावर वर्णी लावली आहे. प्रतिक देसाई यांना अतिशय कमी वयात पक्षाची मोठ मोठी जबाबदारीची पदे मिळाल्याने तरुण कार्यकर्त्यांत जाकादेवी दशक्रोशीत आणि तालुक्यात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.भाजपाची तालुक्यात मोठी ताकद उभी करण्यासाठी तालुका कार्यकारिणी कटीबद्ध असल्याची प्रतिक्रिया नुतन तालुकाध्यक्ष प्रतिक देसाई यांनी दिली.