(नवी दिल्ली)
देशातील सर्वोच्च साहित्यिक सन्मानांपैकी एक असलेल्या साहित्य अकादमी पुरस्कार 2025 ची घोषणा करण्यात आली आहे. यंदाच्या पुरस्कारांमध्ये आठ कविता संग्रह, चार कादंबऱ्या, सहा कथा संग्रह, दोन निबंध संग्रह, एक साहित्य समीक्षा ग्रंथ, एक आत्मचरित्र आणि दोन संस्मरणांचा समावेश आहे.
साहित्य अकादमी दरवर्षी ठरलेल्या कार्यपद्धतीनुसार देशातील 24 मान्यताप्राप्त भाषांमधील उत्कृष्ट साहित्यकृतींना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करते. 2025 च्या पुरस्कारांसाठी निवड प्रक्रिया जानेवारी 2025 मध्ये सुरू झाली होती आणि 30 जानेवारी 2025 रोजी यासंदर्भातील अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली होती.
पुरस्कार विजेत्या साहित्यिकांना कोरीव ताम्रफलक, शाल आणि एक लाख रुपयांचा रोख पुरस्कार देण्यात येतो. या वर्षीचे पुरस्कार 31 मार्च 2026 रोजी नवी दिल्ली येथे होणाऱ्या समारंभात प्रदान केले जाणार आहेत.
तमिळ साहित्यिक एस. तमिळसेल्वन् यांना सन्मान
तमिळ भाषेतील ‘साहित्य समीक्षा’ या प्रकारात एस. तमिळसेल्वन् यांच्या ‘तमिळ सिरुकथैयिन थडंगल’ या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. तमिळ विभागासाठी एकूण 14 पुस्तकांची नोंद झाली होती. निवड समितीने एकमताने तमिळसेल्वन् यांच्या पुस्तकाची निवड केली.
एस. तमिळसेल्वन् हे सध्या Tamil Nadu Progressive Writers and Artists Association या संघटनेचे अध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 27 मे 1954 रोजी तमिळनाडूतील थूथुकुडी जिल्ह्यातील रागलपुरम येथे झाला. त्यांनी कोविलपट्टी महाविद्यालयातून पदवी घेतली. टपाल विभागात सेवा बजावण्याबरोबरच त्यांनी काही काळ सैन्यातही काम केले आहे.
मराठीसाठी राजू बाविस्कर यांचा सन्मान
मराठी भाषेतील आत्मचरित्र या प्रकारात राजू बाविस्कर यांच्या ‘काळ्यानिळ्या रेषा’ या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. मराठी साहित्यातील महत्त्वपूर्ण आत्मकथन म्हणून या पुस्तकाकडे पाहिले जाते.
पुरस्कार विजेते साहित्य प्रकार, पुस्तके, भाषा आणि लेखक यांची यादी खालीलप्रमाणे आहे:
साहित्य प्रकार (कविता)
श्रेष्ठ कविता (बंगाली) — प्रसून बंदोपाध्याय; ठाकूर’ सतसई (डोग्री) — खजूर सिंग ‘ठाकूर’; भट्टखडकी (गुजराती) — योगेश वैद्य; नजदवनेकी पोत अलाव (काश्मिरी) — अली शैदा; पदपुराण (ओडिया) — गिरिजाकुमार बलियारसिंग; प्रस्थानचतुष्टये ब्रह्मघोषः (संस्कृत) — महामहोपाध्याय साधू भद्रेशदास; अनिमेश (तेलुगू) — नंदिनी सिधारेड्डी; सफर जारी है (उर्दू) — प्रीतपाल सिंग बेताब.
साहित्य प्रकार (कादंबरी)- कडी खेलारा साधू (आसामी) — देबब्रत दास; दोनाई लामा: मोनसे गाथोन (बोडो) — सहायसुली ब्रह्मा; Crimson Spring (इंग्रजी) — नवतेज सरना; मायामनुष्यर (मल्याळम) — एन. प्रभाकरन. शैली (कथा)
दादा सेरीसू तांडे (कन्नड), अमरेश नुगाडोनी, कंगलमद्रिब इफुट (मणिपुरी), हाओबाम नलिनी, सेफ्टी किट (पंजाबी), जिंदर, भरखामा (राजस्थानी), जितेंद्र कुमार सोनी, मिड बिरना चेन्ने साओन इनग सगाई (संताली), सुमित्रा सोरेन (भगवान सगाई), वाघनजी (वागं)
शैली (निबंध)
कोंकणी काव्येंरू रुपं आनी रुपकन (कोंकणी), हेन्री मेंडोन्का (एचेम पर्नल), नेपाळी पारंपारिक संस्कृती आणि सभ्यता को धुकुटी (नेपाळी), प्रकाश भट्टराई.
शैली (साहित्यिक टीका)
तमिळ सिरुकथायिन थदंगल (तमिळ), सा. तमिळसेल्वन.
शैली (आत्मचरित्र)
काळ्यानिळ्या रेषा (मराठी), राजू बाविस्कर.
शैली (संस्मरण)
जीते जी अलाहाबाद (हिंदी), ममता कालिया, धात्री पट सं गम (मैथिली) महेंद्र.
साहित्यविश्वात उत्साह
देशभरातील विविध भाषांमधील उत्कृष्ट साहित्यकृतींना दिला जाणारा साहित्य अकादमी पुरस्कार हा भारतीय साहित्यविश्वातील अत्यंत प्रतिष्ठेचा सन्मान मानला जातो. 31 मार्च रोजी होणाऱ्या समारंभात विजेत्या साहित्यिकांचा औपचारिक गौरव केला जाणार आहे.

