(चिपळूण)
दी चिपळूण अर्बन को-ऑप. बँक लि., चिपळूण यांच्या प्रधान कार्यालय व मुख्य शाखेच्या नव्या इमारतीचा भव्य उद्घाटन सोहळा बुधवार, दि. १९ मार्च २०२६ रोजी दुपारी ३.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे.
या इमारतीचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार असून खासदार नारायण राणे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत. यावेळी माजी मंत्री भास्कर जाधव, आमदार शेखर निकम, जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे तसेच चिपळूण नगर परिषदेचे नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांचीही उपस्थिती लाभणार आहे.
चिपळूण अर्बन को-ऑप. बँकेचे अध्यक्ष मोहन बाळकृष्ण मिरगल, उपाध्यक्ष धनंजय अशोक खातू, मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम गुलाबराव सूर्यवंशी तसेच संचालक मंडळ आणि कर्मचारी यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे.
नव्या इमारतीच्या उद्घाटनानिमित्त बँकेचे सभासद, खातेदार आणि हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन बँकेच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच या निमित्ताने गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या शुभेच्छाही बँकेच्या वतीने देण्यात आल्या आहेत.

