(रत्नागिरी)
तालुक्यातील पुर्णगड येथे सोसायटीत कामाला जाणाऱ्या एका प्रौढावर मधमाशांनी अचानक हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात तो जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रदीप रविकांत कामतेकर (वय ४०, रा. पुर्णगड, जि. रत्नागिरी) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (१३ मार्च) सकाळी साडेआठच्या सुमारास घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रदीप कामतेकर हे पुर्णगड येथील सोसायटीत कामासाठी दुचाकीवरून जात असताना रस्त्यात अचानक मधमाशांचा घोळका त्यांच्या अंगावर आला आणि मधमाशांनी हल्ला केला. या हल्ल्यात ते जखमी झाले.
घटनेनंतर त्यांना तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या प्रकरणाची नोंद रुग्णालयातील पोलिस चौकीत करण्यात आली आहे.

