(चिपळूण)
भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चा चिपळूण तालुकाध्यक्षपदी सौ. आदिती अविनाश गुडेकर यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, चिपळूण तालुका मंडल अध्यक्ष विनोद भुरण तसेच जिल्हा विशेष निमंत्रित सदस्य सौ. स्वप्ना यादव यांच्या हस्ते खेर्डी येथील यादव यांच्या ‘स्वामिनी’ निवासस्थानी त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
या निवडीबद्दल आदिती गुडेकर यांच्यावर विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत महिला मोर्चा अधिक मजबूत करण्यासाठी काम करू, अशी ग्वाही गुडेकर यांनी यावेळी दिली.
भिले गावच्या सरपंच असलेल्या आदिती गुडेकर यांनी गावाच्या विकासासाठी अनेक उपक्रम राबवले असून महिला सक्षमीकरणासाठीही त्या सक्रियपणे कार्यरत आहेत. तसेच राजकीय क्षेत्रातही भाजपच्या माध्यमातून पक्षविस्तारासाठी त्या सातत्याने प्रयत्न करत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन भाजपने त्यांच्यावर महिला मोर्चा चिपळूण तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे.
यावेळी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राहुल पवार, अल्पसंख्यांक मोर्चा जिल्हाध्यक्ष लियाकत शहा, उपनगराध्यक्ष सौ. रुपाली दांडेकर, चिपळूण नगरपालिकेचे गटनेते व नगरसेवक शशिकांत मोदी, महिला मोर्चा शहराध्यक्ष तसेच नगरसेविका सौ. रसिका देवळेकर, नगरसेविका सौ. वैशाली निमकर, नगरसेवक संदीप भिसे, नगरसेविका सौ. अंजली कदम, खेर्डीच्या सरपंच सुगंधा माळी, माजी सरपंच प्रकाश पाथरूड, बाळा दाते, कुणाल आंबेकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पुष्पगुच्छ देऊन आदिती गुडेकर यांचा सत्कार करण्यात आला.

