(चिपळूण)
महाराष्ट्र जुनी पेन्शन संघटना तालुका शाखा चिपळूणच्या वतीने चिपळूण तालुक्यात हजर झालेल्या शिक्षक बंधू भगिनींसाठी स्नेहमेळावा जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा ओझरवाडी ता.चिपळूणच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यामध्ये सहभागी नवनियुक्त शिक्षकांचे तालुक्यामध्ये शिक्षक पदी हजर झालेबद्दल स्वागत व अभिनंदन करण्यात आले.
कार्यक्रमात नवनियुक्त शिक्षिका शुभांगी पाटील, स्मिता राऊत व अनुराधा घुले रांगोळी काढून कार्यक्रमाची शोभा वाढवली. तदनंतर महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे तालुकाध्यक्ष श्री.अविनाश जाधव यांनी या मेळाव्याचे प्रास्ताविक केले. प्रास्ताविकात त्यांनी आपले अनुभव कथन करताना संघटनेच्या भूमिकेविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमात पुढे नवनियुक्त शिक्षकांचे स्वागत अभिनंदन पत्र व पुष्प देऊन करण्यात आले. तसेच हे स्वागत स्वीकारताना आपला अल्प परिचय उपस्थित शिक्षकांनी दिला. यात त्यांनी पूर्वीच्या अनुभवाची माहिती तसेच संघटना सदस्यांनी केलेले सहकार्य याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
मेळाव्यात पुढे जिल्हा कार्याध्यक्ष श्री.राहुलजी तुगावकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन व शुभेच्छा दिल्या. संघटनेची ओळख, कार्यपद्धती आणि संघटनेने केलेल्या कामाबद्दल माहिती संघटना जिल्हासचिव श्री.दत्तात्रय क्षिरसागर यांनी सांगितली. त्यात त्यांनी संघटनेची गरज व संघटनेने केलेल्या कामाबद्दल माहिती दिली. मेळाव्यात पुढे अध्यक्षीय भाषण करताना जिल्हाध्यक्ष व संघटनेचे पतपेढीचे संचालक श्री.अंकुशजी चांगण यांनी शिक्षण सेवकांना प्रशासकीय माहिती, शिक्षणसेवक कालावधीतील रजा नियम तसेच शिक्षण क्षेत्रात होत असलेले तंत्रज्ञानविषयक बदल व त्याला सामोरे जाताना करावयाची तयारी, पतपेढीचे शिक्षणसेवकांबाबतचे धोरण याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
या मेळाव्याचे सूत्रसंचालन श्री.मंगेश कुलकर्णी यांनी आपल्या ओघवत्या भाषाशैलीत केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महिला प्रमुख सोनाली सहस्त्रबुद्धे पेन्शन शिलेदार भगिनी संजीवनी महाडिक, रंजिता चांदे, उषा शिंदे, अश्विनी माळेकर, अंजली घाडगे, अनुराधा वरुडे, नाजिया दुंडगे, सायमा तुरुक, सुमय्या साबळे, सविता सूर्यवंशी तसेच पेन्शन शिलेदार तात्यासो खाडे,गणेश कोरनुळे, प्रविण सन्मुख, देवराव शिसोदे, युगेश कदम, बालाजी पुट्टीवार, प्रदीप राठोड, बाबुराव सोळंकी, विजय शिंदे, मनोज खामकर, बालाजी पुलचवाड, परमेश्वर पाटील व विश्वास सोनवलकर व सर्व पेन्शन फायटर आदींचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या शेवटी चिपळूण तालुका सचिव श्री.दीपक कांबळे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.