(गणपतीपुळे / वैभव पवार)
पुणे येथे 19 वर्षाखालील होणाऱ्या मुलींच्या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये माध्यमिक विद्यालय भागशाळा व श्रीम.पार्वती शंकर बापट कनिष्ठ महाविद्यालय वाटद खंडाळा ता.रत्नागिरी येथील तीन मुलींची जिल्हा संघात निवड झाली आहे. सानिया महाकाळ, मनाली निंबरे, सानिका आलीम या तिन्ही मुली अष्टपैलू असून गेली चार वर्षे त्या शालेय व रत्नागिरी जिल्ह्याकडून वयोगटातून पुणे येथे मॅचेस खेळलेल्या आहेत.
21 डिसेंबर ते 28 डिसेंबर पर्यंत पुणे येथे या स्पर्धा होणार आहेत. या खेळाडूंना प्रशालेचे क्रीडाशिक्षक डॉ.राजेश जाधव, पल्लवी बोरकर यांनी मार्गदर्शन केले. या खेळाडूंना संस्थाध्यक्ष डॉ.राजेंद्र विचारे, उपाध्यक्ष नाथाशेठ आडाव, सचिव समीरशेठ बोरकर, संस्थेचे सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक शिवाजी जगताप, पर्यवेक्षक आनंदा पाटील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

