(रत्नागिरी / वार्ताहर )
शिवशक्ती मित्रमंडळ, घोसाळेवाडी आंबेशेत यांच्या वतीने घोसाळेवाडी येथे भव्य पालखी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा बुधवार, ११ मार्च २०२६ रोजी रात्री ११ वाजता होणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे.
या स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी रोख २५ हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी १५ हजार रुपये तर तृतीय क्रमांकासाठी ११ हजार रुपयांचे पारितोषिक ठेवण्यात आले आहे. परिसरातील पालखी नृत्य पथकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
स्पर्धेबाबत नियम व अटी तसेच अधिक माहितीसाठी श्री. प्रितम प्रकाश घोसाळे (मो. 7741077727), श्री. अमोल अनिल घोसाळे (मो. 9067818481) आणि श्री. शैलेश शशिकांत झापडेकर (मो. 9527473717) यांच्याशी संपर्क साधावा, असे आयोजकांनी कळविले आहे.
या पालखी नृत्य स्पर्धेमुळे शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

