( रत्नागिरी )
जिना चढत असताना अचानक तोल जाऊन पडल्याने गंभीर जखमी झालेल्या वयोवृद्धाचा उपचारादरम्यान कोल्हापूर येथील सी.पी.आर. रुग्णालयात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मयताचे नाव वसंत उलगप्पा भिंगारे (वय ७४, रा. फणसोप, वांयगणी फाटा, ता.जि. रत्नागिरी) असे आहे.
ही घटना १९ जून २०२५ रोजी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास घडली. जिना चढत असताना भिंगारे यांचा तोल जाऊन ते खाली पडले होते. यानंतर त्यांना तातडीने सिव्हिल हॉस्पिटल, रत्नागिरी येथे दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर अधिक उपचारासाठी त्यांना सी.पी.आर. हॉस्पिटल, कोल्हापूर येथे हलविण्यात आले. मात्र, उपचार सुरु असतानाच तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची नोंद आकस्मिक मृत्यू क्रमांक ६३/२०२५ प्रमाणे करण्यात आली असून, भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम १९४ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.