(चिपळूण)
भारतीय जनता पार्टीच्या रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प्रशांत यादव यांनी नूतन जिल्हा कार्यकारिणीची अधिकृत घोषणा केली. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मान्यतेनंतर ही यादी जाहीर करण्यात आली.
पक्ष संघटन अधिक बळकट करणे आणि आगामी निवडणुकांचे आव्हान समर्थपणे पेलणे या उद्देशाने अनुभवी व तरुण कार्यकर्त्यांचा समतोल या कार्यकारिणीत साधण्यात आला आहे. जिल्हाध्यक्ष म्हणून प्रशांत यादव (चिपळूण) जबाबदारी सांभाळणार आहेत.
उपाध्यक्ष:
प्रमोद अधटराव (संगमेश्वर), संदीप सुर्वे (रत्नागिरी), संगीता जाधव (संगमेश्वर), बळीराम मोरे (चिपळूण), स्नेहा मेस्त्री (चिपळूण), चंद्रकांत मांडवकर (संगमेश्वर), भास्कर सुतार, विकास सावंत (राजापूर), सुहास आटलेकर (रत्नागिरी) आणि शीतल पटेल (राजापूर).
सरचिटणीस:
ओंकार फडके (रत्नागिरी), स्वानंद रानडे (चिपळूण), अभिजित गुरव (राजापूर), सुप्रिया उतेकर (चिपळूण).
चिटणीस:
राजन पटवर्धन (रत्नागिरी), नीलेश भुरवणे (संगमेश्वर), योगेश शिर्के (चिपळूण), मनोज पाटणकर (रत्नागिरी), नयना पवार (चिपळूण), अनिल सावर्डेकर (चिपळूण), समीर टाकळे (चिपळूण), समिरा सुर्वे (लांजा दक्षिण), अपेक्षा दाभोळकर (लांजा उत्तर) आणि अभिनव भुरण (चिपळूण).
कोषाध्यक्ष:
मकरंद ऊर्फ आशिष खातू (चिपळूण).
जिल्हा विशेष निमंत्रित सदस्य:
देवेंद्र फडणवीस, नारायण राणे, नितेश राणे यांच्यासह माजी आमदार विनय नातू, प्रमोद जठार, माजी युवा जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन, दीपक पटवर्धन, विलास पाटणे आणि अन्य सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे.
नवीन कार्यकारिणीबाबत प्रशांत यादव यांनी विश्वास व्यक्त केला की, सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकजुटीने काम करून जिल्ह्यात पक्ष संघटना अधिक व्यापक आणि सक्षम करतील. या निवडीबद्दल प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीही सर्व नूतन पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

