(गावखडी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी येथील श्री स्वामी समर्थ मठ येथे पौर्णिमेचे औचित्य साधून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. परिसरातील भाविकांसाठी हा दिवस भक्तीमय वातावरणात साजरा होणार आहे.
मठात आज सोमवार दि. ३ मार्च रोजी सकाळी ७ वाजता श्री स्वामी समर्थांची विधिवत पूजा, त्यानंतर सकाळी ८ वाजता स्वामींच्या पादुकांवर अभिषेक करण्यात येत असून, सकाळी ९.३० वाजता पालखी प्रदक्षिणेचे आयोजन केले आहे. सकाळी १० वाजता आरती होऊन कार्यक्रमाची सांगता होणार आहे.
पौर्णिमेनिमित्त होणाऱ्या या सर्व धार्मिक विधी आणि कार्यक्रमांचा लाभ भाविकांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन मठाचे पुजारी श्री. सहदेव पावसकर यांनी केले आहे. या कार्यक्रमामुळे मेर्वी आणि आसपासच्या परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले असून, स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने परिसर दुमदुमले आहे.
भाविकांनी शांतता व शिस्त पाळून कार्यक्रमात सहभागी व्हावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

