(पाली / वार्ताहर)
पालकमंत्री उदय सामंत यांच्या निर्देशानुसार पाली विभागातील साठरे-बांबर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शिवसेनेचे ग्रामपंचायत सदस्य रुपेश खोचाडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
या वेळी शिवसेना हातखंबा-पाली जि.प. गटाचे विभागप्रमुख सचिन सावंत, विभाग संघटक दत्ताराम शिवगण, उपविभागप्रमुख गौरव संसारे, सरपंच तृप्ती पेडणेकर, ग्रामपंचायत अधिकारी श्रावणी कोकरे, माजी उपसरपंच प्रमोद ठीक, ग्रामपंचायत सदस्य जयनंद सावंत, सिद्धी रसाळ, निकिता तेरेकर, प्रीती पवार, गायत्री चव्हाण, माजी सरपंच प्रभाकर खोचाडे, संजय तेरेकर, श्रीराम रसाळ, पोलीस पाटील संजू सावंत, तसेच गुरुदास सुर्वे, नरेश रसाळ आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवडीनंतर बोलताना उपसरपंच रुपेश खोचाडे म्हणाले, “माझ्यावर पक्षाने दाखवलेला विश्वास मी नक्कीच सार्थ ठरवीन. सर्व ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी आणि ग्रामस्थांना सोबत घेऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहीन. गावाला आदर्शवत बनविण्यासाठी पूर्ण ताकदीने कार्य करेन.”
फोटो:
साठरे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल रुपेश खोचाडे यांचे अभिनंदन करताना विभागप्रमुख सचिन सावंत, सरपंच तृप्ती पेडणेकर व अन्य मान्यवर.