(गावखडी / वार्ताहर)
राजापूर तालुक्यातील कशेळी येथील श्री दत्त मंदिरात, प्रति वर्षीप्रमाणे यंदाही ओम गुरुदत्त शिष्य मंडळ, मुंबई–कशेळी आणि स्थानिक भक्तगण यांच्या संयुक्त विद्यमाने ४ डिसेंबर २०२५ रोजी श्री दत्त जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात येणार आहे. जयंतीनिमित्त दोन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमांची रूपरेषा :
दि. ४ डिसेंबर २०२५
- पहाटे ५.०० वाजता – काकड आरती, सप्तदेवतांची पूजा
- होम–हवन व गुरुचरित्र पारायण
- दुपारी १२.०० वाजता – महाप्रसाद
- सायं. ४.०० वाजता – आनंदाबुवा होळकर यांचे श्री दत्त जन्म विषयावर किर्तन
- सायं. ६.०० वाजता – ओम ध्वनी, आरती, पालखी प्रदक्षिणा
दि. ५ डिसेंबर २०२५
- दुपारी १२.०० वाजता – माधुकरी प्रसाद
- सायं. ५.०० वाजता – श्री सत्यनारायण महापूजा, आरती व दर्शन
- रात्री ८.०० वाजता – महिलांचा हळदीकुंकू कार्यक्रम
भक्तगणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री दत्तप्रभूंच्या कृपेचा, महाप्रसादाचा आणि कीर्तनाच्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. महाप्रसादासाठी देणगी देऊ इच्छिणाऱ्या भाविकांनी रोख स्वरूपात देणगी द्यावी, ती महाप्रसादासाठीच वापरली जाईल, असेही कळविण्यात आले आहे.
कार्यक्रमांच्या वेळेत आवश्यकतेनुसार बदल करण्याचा सर्वाधिकार ओम गुरुदत्त शिष्य मंडळाकडे असेल, याची भक्तांनी नोंद घ्यावी, असे मंडळाकडून सांगण्यात आले आहे.

