(रत्नागिरी)
स्त्रीयांचे लोकमान्य टिळक स्मारक मंडळ संचलित भगिनी मंडळाचे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच उत्साहात पार पडले. या वेळी नूतन नगराध्यक्ष सौ. शिल्पा सुर्वे यांचा मंडळाच्यावतीने सत्कार करण्यात आला.
शंभरहून अधिक वर्षांची परंपरा असलेल्या या मंडळात या वर्षी पाककला स्पर्धा घेण्यात आली. पनीर घालून गोड पदार्थ आणि चणाडाळ वापरून तिखट पदार्थ करणे अशी स्पर्धा होतील. ताटाभोवती पानाफुलांची रांगोळी हा कलाकुसरीचा स्पर्धेचा विषय होता.
पनीरपासून गोड पदार्थ बनवण्याच्या स्पर्धेत प्रथम रुचा जोग, द्वितीय वैशाली जोशी आणि चणाडाळपासून तिखट पदार्थ स्पर्धेत प्रथम कल्याणी पटवर्धन, द्वितीय वैशाली जोशी, ताटाभोवती पानाफुलांची रांगोळी स्पर्धेत प्रथम रूचा जोग व द्वितीय दया भिडे यांनी क्रमांक पटकावला. या तिन्ही स्पर्धांना सौ. उल्का पटवर्धन, सौ. श्वेता शितूत आणि सौ. सुषमा दिवेकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. विजेत्यांना सौ. सुर्वे यांच्या हस्ते बक्षीसे देऊन गौरवण्यात आले.

