(मंडणगड)
मंडणगड तालुक्यातील पालवणी चेकपोस्ट परिसरात १८ वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
ऐश्वर्या किसन पवार (वय १८), मूळ रहिवासी कलबुर्गी, कर्नाटक राज्य, सध्या पालवणी फाटा (मंडणगड) येथे वास्तव्यास होती. ती १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सुमारे ५.३० वाजता घरातून बाहेर पडली होती. सायंकाळी सुमारे ७.३० वाजण्याच्या सुमारास पालवणी चेकपोस्ट येथील बैठकीच्या हॉलजवळ असलेल्या काजूच्या झाडाला तिने ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच मंडणगड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या प्रकरणी १८ फेब्रुवारी रोजी रात्री १०.०० वाजता पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू क्र. ०२/२०२६ अशी नोंद करण्यात आली आहे.
एवढ्या कमी वयात ऐश्वर्या हिने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मंडणगड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून कुटुंबीयांची चौकशी सुरू आहे.

