(चिपळूण)
सह्याद्री विज्ञान मंच आयोजित सह्याद्री प्रज्ञाशोध परीक्षा 2025–26 मध्ये न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, खेर्डी–चिंचघरी (सती विद्यालय) यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. इयत्ता आठवी–नववी गटात सहभागी झालेल्या सह्याद्री शिक्षण संस्थाच्या 20 शाळांमधील अटीतटीच्या स्पर्धेत विद्यालयातील कु. दक्ष दिनेश गिजये आणि कु. तनिष्का सुरेश जाधव यांनी अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. अंतिम फेरीत सर्वाधिक गुण मिळवत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
ही परीक्षा अत्यंत स्पर्धात्मक स्वरूपाची असून विद्यार्थ्यांनी बुद्धिमत्ता, सातत्यपूर्ण परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर हे यश मिळवले. या कामगिरीमुळे विद्यालयाच्या शैक्षणिक परंपरेत मानाचा आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
या यशामागे विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन, नियोजन आणि सातत्यपूर्ण सराव देणाऱ्या सौ. मैथिली राजेशिर्के, सौ. प्राजक्ता खेडेकर, श्री. शिवाजी पाटील, सौ. स्नेहल भोसले, सौ. राजश्री सावंत आणि कु. शर्मिला म्हादे यांचे मोलाचे योगदान आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष आमदार श्री. शेखरजी निकम, सेक्रेटरी श्री. महेश महाडिक, ज्येष्ठ संचालक श्री. शांताराम खानविलकर, सह्याद्री कॉम्पिटिटिव्ह एक्झामचे चेअरमन श्री. अनिरुद्ध निकम, संस्थेचे सर्व पदाधिकारी, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. संजय वरेकर, उपमुख्याध्यापिका सौ. सुलोचना जगताप तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

