(चिपळूण)
कोल्हापूर येथे संपन्न झालेल्या विभागीय शालेय ज्युदो स्पर्धेत न्यू.इंग्लिश स्कूल व ज्युनि कॉलेज खेर्डी चिंचघरी सती विदयालयाच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी केली आहे. या स्पर्धेत 19 वर्ष 74 किलो वजनी वयोगटात कु.यश संजय जाधव प्रथम क्रमांक, 80 किलो वजनी गटात कु.प्रणव अरुण राजेशिर्के याने तृतीय क्रमांक पटकावला. या क्रीडापटूनि नेत्र दिपक कामगिरी करून सह्याद्री शिक्षण संस्थेचे नाव विभागस्तरावर उंचाविले. तसेच कु.यश संजय जाधव यांची पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सदर स्पर्धेसाठी क्रीडा शिक्षक श्री.महेश सावंत यांनी मार्गदर्शन केले. यावेळी क्रीडा अधिकारी श्री.प्रवीण कोंढवळे उपस्थित होते.
सहभागी सर्व विद्यार्थी,व मार्गदर्शक शिक्षक यांचे सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष,आमदार श्री. शेखरजी निकम, संस्थेचे अध्यक्ष श्री.बाबासाहेब भुवड, संस्थेचे सेक्रेटरी श्री.महेश महाडिक, संस्थेचे जेष्ठ संचालक श्री.शांताराम खानविलकर, संस्थेचे सर्व पदाधिकारी, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.संजय वरेकर, उपमुख्याध्यापक श्री.विश्वास दाभोळकर, पर्यवेक्षक श्री.पांडुरंग पाटील, सौ.आसावरी राजेशिर्के,सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, यांनी अभिनंदन केले असून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.