(देवरूख /प्रतिनिधी)
संगमेश्वर तालुक्यातील भालेकर भावकीचे कुळदैवत आदिशक्ती भैरीभवानी मातेचा त्रैवार्षिक पांजीचा गोंधळ सोहळा रविवार, दिनांक २२ फेब्रुवारी २०२६ रोजी तांबडी गवळवाडी येथे भक्तिभावाने साजरा होणार आहे.
सोहळ्याची कार्यक्रम रूपरेषा
सकाळी ११.०० वाजता उद्देपण, दुपारी २.०० वाजता भैरीभवानी मातेचे पूजन, सायंकाळी ५.०० वाजता मातेचा जोगवा, संध्याकाळी ७.०० वाजता पतिर भरणे, रात्री ७.३० ते ८.३० या वेळेत देवीची महाज्योत प्रदक्षिणा होणार आहे. त्यानंतर नवस बोलणे व नवस फेडण्याचा विधी पार पडेल. रात्री ९.०० वाजता देवीचा महाप्रसाद असून रात्री १०.३० ते सकाळी ५.०० वाजेपर्यंत गोंधळी मंडळींकडून पौराणिक कथानकावर आधारित “गोंधळ मांडीला… आई भवानी” हा पारंपरिक गोंधळ सादर केला जाणार आहे.
आपण ज्या कुळात जन्म घेतला आहे त्या कुळस्वामिनीचे दर्शन घेण्यासाठी सहकुटुंब, सहपरिवार व मित्रपरिवारासह उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन यजमान संदीप पांडुरंग भालेकर यांच्यासह समस्त भालेकर भावकीने केले आहे.
विशेष सूचना
संगमेश्वर डेपोमधून एस. टी. बससेवा सकाळी ८.०५, दुपारी १२.५५ व सायंकाळी ४.४५ या वेळेत उपलब्ध आहे. (संगमेश्वर–शैबवणे व्हाया गुरववाडी) तांबडी गवळवाडी बस स्टॉप येथे उतरण्याची सुविधा आहे.
गुगल लोकेशन: श्री राधाकृष्ण मंदिर, तांबडी.

