( संगमेश्वर / प्रतिनिधी )
संगमेश्वर तालुक्यातील फणसवणे विचारेवाडी येथील श्री भैरी मंदिरात सोमवार दिनांक २३ फेब्रुवारी २०२६ रोजी श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली आहे. या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून परिसरातील भाविकांनी दर्शन आणि तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजक यांनी केलं आहे.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९ वाजता श्री भैरी देवाची पूजा, अभिषेक व आरतीने होणार आहे. त्यानंतर सकाळी १० वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा संपन्न होईल. दुपारी १२ वाजता महाआरती आयोजित करण्यात आली असून त्यानंतर उपस्थित भाविकांना तीर्थप्रसाद देण्यात येणार आहे. दुपारी १ ते २.३० या वेळेत महाप्रसाद कार्यक्रम संपन्न होणार आहे.या धार्मिक सोहळ्यास सर्व भाविकांनी परिवार व मित्रमंडळीसह उपस्थित राहून दर्शन, तीर्थप्रसाद व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आग्रहाचे निमंत्रण सत्यवान विचारे व सौ. स्नेहा विचारे यांनी दिले आहे.

