(देवरुख / प्रतिनिधी)
फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या बारावी परीक्षेची बैठक व्यवस्था देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालय आणि न्यू इंग्लिश स्कूल, देवरुखच्या इमारतीमध्ये करण्यात आली आहे. या परीक्षेला मंगळवार दिनांक १० फेब्रुवारी, २०२६ पासून इंग्रजी विषयाच्या पेपरने सुरुवात होणार आहे. बारावी परीक्षेला देवरुख केंद्रातून एकूण ७३१ विद्यार्थी बसणार आहेत. यामध्ये कला, वाणिज्य, व्यावसायिक अभ्यासक्रम आणि विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांचा समावेश असणार आहे.
आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालय, देवरुख मुख्य इमारत
विज्ञान शाखा: सीट नंबर डब्ल्यू ००३९५५ ते डब्ल्यू ००४२११, वाणिज्य शाखा: सीट नंबर डब्ल्यू ०१८०१९ ते डब्ल्यू ०१८२२१, एकूण ४५६ विद्यार्थी.
न्यू इंग्लिश स्कूल, देवरुख इमारत- वाणिज्य शाखा: सीट नंबर डब्ल्यू ०१८२२२ ते डब्ल्यू ०१८२५६ आणि डब्ल्यू ०१८००४ ते डब्ल्यू ०१८०१८ व्यावसायिक अभ्यासक्रम- बँकिंग: सीट नंबर डब्ल्यू ०२३३०६ ते डब्ल्यू ०२३३२६, कला शाखा: सीट नंबर डब्ल्यू ०११४३१ ते डब्ल्यू ०११६३४, एकूण २७५ विद्यार्थी. देवरुख केंद्रातून प्रविष्ट होणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या ७३१ आहे.
प्रत्येक पेपरला बैठक व्यवस्था बदलणार असल्याची विद्यार्थिनी नोंद घ्यावी. संपूर्ण परीक्षा कॉपीमुक्त, गैरमार्गमुक्त, निकोप व सुरळीत वातावरणात पार पडण्यासाठी मा. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती स्थापन करण्यात आली आहे.
परीक्षार्थीनी सकाळच्या सत्रातील पेपरला १०:१५ वाजता व दुपारच्या सत्रातील पेपरला ०२:१५ परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावयाचे आहे. परीक्षार्थींना सकाळच्या पेपरला ११:०० वा. पर्यंत व दुपारच्या पेपरला ०३:०० वा. पर्यंतच परीक्षा दालनात प्रवेश मिळेल, त्यानंतर उशिरा येणाऱ्यास प्रवेश मिळणार नाही. परीक्षेला येतेवेळी रिसीट, ओळखपत्र व आवश्यक लेखन साहित्य इत्यादी न विसरता आणावयाचे आहे.
सर्व परीक्षार्थींना देवरुख शिक्षण प्रसारक मंडळ व महाविद्यालयातर्फे शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर व केंद्र संचालक प्रा. एम. आर. लुंगसे यांनी सर्व परीक्षार्थींना तणावमुक्त परीक्षा द्यावी, असे आवाहन केले आहे.

