(चिपळूण)
कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेच्या भव्य क्रीडांगणावर शासन पुरस्कृत राज्यस्तरीय ग्रामीण, कृषी व सहकार साहित्य संमेलनाच्या मंडप उभारणीचा उद्घाटन सोहळा आज, गुरुवार दि. ५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता उत्साहात पार पडला. संयोजन समितीचे अध्यक्ष श्री. प्रकाशजी देशपांडे यांच्या शुभहस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
या उद्घाटन सोहळ्याला साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे, प्रमुख कार्यवाह डॉ. निखिल चोरगे, स्मरणिका छपाई समितीच्या अध्यक्षा सौ. अंजली चोरगे, कोषाध्यक्ष श्री. अजय चव्हाण, प्रसिद्धी व प्रचार समितीच्या प्रमुख डॉ. शमिका चोरगे, संस्थेचे सचिव श्री. मिलिंद सुर्वे उपस्थित होते. तसेच प्राचार्य डॉ. संकेत कदम, प्राचार्य सचिन तांबेकर आणि रावसाहेब सुर्वे आदी मान्यवर उपस्थित होते.
या उद्घाटनाने राज्यस्तरीय ग्रामीण, कृषी व सहकार साहित्य संमेलनाच्या तयारीला अधिक वेग मिळाला असून, आगामी संमेलनासाठी परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

