(संगमेश्वर)
तक्षशिला क्रिकेट क्लब, निवे बु. यांच्या वतीने बौद्धजन विकास मंडळ (स्थानिक व मुंबई) यांच्या सहकार्याने संविधान चषक मर्यादित षटकांची ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा ३१ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत यशस्वीपणे पार पडली. संगमेश्वर तालुक्यात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेला खेळाडू आणि क्रीडारसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
स्पर्धेचे उद्घाटन बौद्धजन विकास मंडळ (स्थानिक व मुंबई) व माता यशोधरा महिला मंडळाच्या अध्यक्षा तसेच सरपंच सौ. संचिता कुवळेकर, उपसरपंच कृष्णा जोशी, पोलिस पाटील शांताराम इप्ते, मुंबई भावकीचे अध्यक्ष अशोक जाधव आणि ग्रामपंचायत सदस्य वैभव सुर्वे यांच्या हस्ते झाले.
यावेळी श्री श्याम पाल्ये, अमोल जाधव, नीलम जाधव, दलित सेवा संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत यादव, सुरेशशेठ रसाळ, सोसायटीचे चेअरमन दिनकर विभुते, अशोक शिंदे, रवि राजवाडे तसेच अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या संविधान चषक क्रिकेट स्पर्धेत एकूण २४ संघांनी सहभाग नोंदवला. अंतिम सामन्यात उत्कृष्ट कामगिरी करत केदारनाथ क्रिकेट क्लब, खरवते लांजा (एक ग्रामपंचायत) यांनी प्रथम क्रमांक पटकावत रु. २० हजारांचे रोख पारितोषिक आणि आकर्षक चषक मिळवला. श्रीजुगाई क्रिकेट क्लब, बेर्डेवाडी तुळसणी (संगमेश्वर) यांनी उपविजेतेपद मिळवत रु. १५ हजारांचे पारितोषिक व चषक स्वीकारला.
स्पर्धेचे समालोचन रुपेश कांबळे (घाटकोपर, मुंबई) यांनी प्रभावीपणे केले. संविधान चषक स्पर्धा यशस्वी होण्यासाठी मंडळाचे पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते तसेच ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले. स्पर्धेच्या समारोपप्रसंगी तक्षशिला क्रिकेट क्लब, निवे बु.चे अध्यक्ष यांनी उपस्थितांचे आभार मानून स्पर्धेची सांगता केली.

