(रत्नागिरी)
रत्नागिरी तायक्वांडो स्पोर्ट्स असोसिएशनच्या मान्यतेने आणि संघ रत्नागिरी यांच्या सहकार्याने आयोजित १९ वी क्युरोगी व १३ वी पूमसे रत्नागिरी जिल्हा खुली चॅलेंज तायक्वांडो स्पर्धा २०२६-२७ ही ६ ते ८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथील बॅडमिंटन हॉल, रत्नागिरी येथे मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.
या जिल्हास्तरीय स्पर्धेत संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजापूर, चिपळूण, खेड, दापोली, मंडणगड आणि गुहागर तालुक्यांमधून सुमारे ६५० खेळाडू सहभागी होणार आहेत. या स्पर्धेसाठी गणराज तायक्वांडो क्लबच्या खेळाडूंची अधिकृत निवड करण्यात आली असून हे खेळाडू रत्नागिरी तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
खेळाडू निवडीच्या वेळी गणराज क्लबच्या अध्यक्षा अॅड. सौ. पूजा प्रसाद शेट्ये, महिला प्रमुख प्रशिक्षक सौ. आराध्य प्रशांत मकवाना, क्लब उपाध्यक्षा सौ. साक्षी मयेकर, सचिव सौ. रंजना मोंडूळा, प्रशिक्षक डॉ. मयुरेश नडगिरी यांच्यासह आदिती शिवगण, अनिकेत पवार, साहिल शिवगण, शीतल वायंगणकर, शर्मिला वराडकर आणि आशका रसाळ उपस्थित होते.
ओपन तायक्वांडो चॅम्पियनशिपसाठी निवड झालेल्या खेळाडूंमध्ये विधी दुबे, श्रीनय कदम, मीरा वायंगणकर, युबना संदे, नीरज मकवाना, तीर्था मकवाना, दुर्वा हातिसकर, श्राव्या वाडकर, मानस रहाटे, स्पर्श रेडीज, आध्या रसाळ, अनया वणजू, बरखा संदे, स्वराली जाधव, शौर्या जाधव, आर्या वराडकर, अखिलेश वायंगणकर, विहान शेट्ये, अथर्व मुरकुटे, विहान घाग, अहना रसाळ, केशर शेरे, गौरी विलणकर, त्रिशा मयेकर, समर्थ विचारे, आदया कवितके आणि श्रेष्ठा विलणकर यांचा समावेश आहे.
निवड झालेल्या खेळाडूंना जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे, नवलाई ग्रुपचे संचालक राजेंद्र सावंत, गणराज क्लबच्या अध्यक्षा अॅड. सौ. पूजा प्रसाद शेट्ये, रत्नागिरीच्या नगराध्यक्षा सौ. शिल्पाताई प्रशांत सुर्वे, नगरसेविका सौ. पुजाताई दीपक पवार, नगरसेवक राजन शेट्ये व सौरभ मलुष्टे, के. एस. पोवार, उपाध्यक्षा सौ. साक्षी मयेकर, सदस्य परेश मोंडूळा, सौ. स्नेहा मोरे, सौ. शलाका जावकर, वरिष्ठ खेळाडू तसेच पालकवर्गाने शुभेच्छा दिल्या आहेत.
या स्पर्धेत गणराज क्लबचे खेळाडू उत्कृष्ट कामगिरी करतील, असा विश्वास क्रीडा रसिकांमधून व्यक्त केला जात आहे.

