(रत्नागिरी)
जागृत मोटर्स प्रा. ली. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मारुती सुझुकी चे अधिकृत डीलर असून नुकताच २५ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून श्री भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालय, रत्नागिरी यांना व्हीलचेअर्स प्रदान करण्यात आल्या. यावेळी जागृत मोटर्स च्या मॅनेजींग डायरेक्टर सौ. रेश्मा जोशी उपस्थित होत्या.
यावेळी डॉ.सौ.रश्मी खेडकर – हेड ऑफ डिपार्टमेंट यांनी जिजाऊ शेक्षणिक व सामाजिक संस्था मार्फत चालणाऱ्या सर्व सामाजिक उपक्रमाची माहिती तसेच श्री भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालय मध्ये लोकांना मिळणाऱ्या सुविधा याबद्दल संपूर्ण माहिती दिली.
यावेळी बोलताना जागृत मोटर्स च्या मॅनेजींग डायरेक्टर सौ. रेश्मा जोशी म्हणाल्या, आपल्या संस्थेची कामगिरी अत्यंत प्रेरणादायी तसेच गरजू लोकांकरिता अत्यंत उपयोगी उपक्रम आहे. या रुग्णालयामुळे समाजातील गरजू रुग्णांना लाभ मिळत असून हा उपक्रम अतिशय प्रेरणादायी आहे. तसेच श्री भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालय येथे लोकांना मिळणाऱ्या सुविधा अत्यंत चांगल्या व दर्जेदार आहेत. यंदाच्या वर्षी जागृत मोटर्सने २५ व्या वर्षात पदार्पण केले. त्यानिमित्य ह्या उपक्रमास प्रोत्साहन देण्याकरिता व्हीलचेअर्स द्वारे जास्तीत जास्त गरजू लोकांची सेवा व्हावी याकरिता छोटीशी भेट असल्याचे त्यांनी सांगितले,
तसेच सर्व रत्नागिरी व जिल्ह्यातील गरजू लोकांनी ह्या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालय, अधिकारी व कर्मचारी यांनी सांगितले. ह्या कार्यक्रमास जागृत मोटर्स प्रा. ली. चा अधिकारी व कर्मचारी वर्ग तसेच श्री भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालय, रत्नागिरी येथील सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

