(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड गावची ग्रामदैवता श्री चंडिका देवीच्या मंदिरात शिवसेना, भाजपा, आरपीआय महायुतीच्या कोतवडे जिल्हा परिषद गटाचे लोकप्रिय उमेदवार राजेश उर्फ राजू साळवी आणि नेवरे पंचायत समिती गणाच्या सक्षम महिला उमेदवार पूर्वा सचिन दुर्गवळी यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज सोमवारी 26 जानेवारी रोजी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या शुभ दिनाचे औचित्य साधून महायुतीचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मोठ्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी मालगुंड गावचे आणि श्री चंडिका देवी मंदिराचे मुख्य गुरव भगवान लिंगायत यांनी जिल्हा परिषदेचे उमेदवार राजेश उर्फ राजू साळवी आणि पंचायत समिती गणाच्या उमेदवार पूर्वा दुर्गवळी यांच्या विजयासाठी ग्रामदैवता श्री चंडीका देवीला गाऱ्हाणे घातले.
याप्रसंगी दोन्ही उमेदवारांच्या हस्ते ग्रामदैवता श्री चंडिका देवीची पूजाअर्चा करून आपल्या विजयासाठी महायुतीचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यासमोर मनोभावे प्रार्थना करण्यात आली. यावेळी ग्रामदैवता श्री चंडिका देवीच्या समोर महायुतीच्या सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपल्या दोन्ही उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार केला. तसेच आई श्री चंडिका देवीचा आशीर्वाद आपल्या कायमपणे पाठीशी राहू दे अशी मनोभावे सामुदायिक प्रार्थना केली.
या प्रचाराच्या शुभारंभप्रसंगी शिवसेनेचे विधानसभा संघटक प्रकाश साळवी, शिवसेनेचे उपतालुका संघटक अभिषेक उर्फ भैय्या साळवी, माजी सभापती साधना साळवी, भाजपा ओबीसी मोर्चाचे तालुकाध्यक्ष सन्मान मयेकर, भाजपा कार्यकर्ते अवधूत केळकर, सचिन दुर्गवळी, किशोर डांगे, शिवसेनेचे शाखाप्रमुख अतुल पाटील, कार्यकर्ते संजय दुर्गवळी बाबू साळवी, वैभव पवार, रजत पवार दिनेश गोणबरे, सरपंच श्वेता खेऊर, उपसरपंच स्मिता दुर्गवळी, ग्रामपंचायत सदस्य नितीन दुर्गवळी, सदस्या सौ. शिल्पा पवार, सौ. डांगे, सौ. गोणबरे आदींसह महायुतीचे अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

