(रत्नागिरी)
क्रीडाई रत्नागिरीच्या वतीने ०१ मे महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिन साजरा करण्यात आला. यानिमित्ताने सार्वजनिक उपक्रम म्हणून बांधकाम साईट वरील कामगारांचे आरोग्य तपासणी शिबीर रंजनमंदिर हॉल शिर्के हायस्कूल, माळनाका, रत्नागिरी येथे घेण्यात आले.
क्रिडाई रत्नागिरी मागील ११ वर्षांपासून हा उपक्रम राबवीत आहे. या शिबिरामध्ये २०० पेक्षा जास्त कामगारांचे आरोग्य तपासणी करून त्यांना औषधे वाटप करण्यात आली. तसेच लायन्स आय हॉस्पिटल तर्फे कामगारांचे डोळे तपासणी करून त्यांना क्रिडाई च्यावतीने चष्मे देण्यात आले. बांधकाम कामगारांना जीवनाऊपयोगी भेटवस्तू देऊन त्यांच्या नाश्ता व जेवणाची व्यवस्था करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित डॉ. जयप्रकाश रामानंद यांचे कामगारांना आरोग्य विषयक मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच या निमित्ताने होत असलेल्या उपक्रमाबद्दल क्रिडाई रत्नागिरीचे कौतुकही त्यांनी केले. लायन्स क्लब रत्नागिरी अध्यक्ष श्री. गणेश धुरी यांनी या कार्यक्रमाचे कौतुक करून क्रिडाई सदस्यांना शुभेच्छा दिल्या. लायन्स चॅरिटेबल ट्रस्टचे श्री. पराग पानवलकर यांनी लायन्स तर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या उपक्रमांबद्दल माहिती दिली. तसेच क्रिडाई अध्यक्ष श्री. महेश गुंदेचा यांनी जास्तीत जास्त बांधकाम कामगारांच्या नोंदणी बाबत सांगताना जिल्हा शासकीय रुग्णालय आणि लायन्स क्लब चे आभार मानले.
या कार्यक्रमासाठी जिल्हा रुग्णालय डॉ. अंकुश शिरसट, डॉ. सुधांशू कुलकर्णी, डॉ. तेंडूलकर, लायन्स आय हॉस्पिटल डॉ. किशोर सूर्यवंशी, श्री. ओंकार फडके, शिर्के हायस्कूल मुख्याध्यापक श्री. कांबळे सर, क्रीडाई महाराष्ट्र सहसंयोजक श्री. दीपक साळवी, क्रीडाई रत्नागिरी माजी अध्यक्ष श्री. नित्यानंद भुते, सेक्रेटरी श्री. प्रदीप कट्टे, सहसेक्रेटरी श्री. मनोज पाटणकर, खजिनदार श्री. महावीर जैन, बोर्ड मेंबर श्री. दिनेश जैन, श्री. मिथुन मणियार, श्री. जयंतीलाल जैन, श्री. सुमित ओसवाल, श्री. मुद्दसर मुकादम, श्री. प्रवीण लाड, सदस्य श्री. अनिल चन्ने, श्री. विरेंद्र वणजू तसेच पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्था उपाध्यक्ष श्री.रुपेश साळवी यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संस्था उपाध्यक्ष श्री. प्रवीण जैन यांनी केले. या कार्यक्रमासाठी प्रमुख प्रायोजकत्व जे. के. सिमेंट कंपनीने स्वीकारले होते.