(रत्नागिरी)
शहरानजीकच्या भाट्ये रस्त्यावर दुचाकी घसरून झालेल्या अपघातात तरुण स्वार जखमी झाला. त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ऐजाज अल्ताप बावनी (वय २५, रा. गवळीवाडा, रत्नागिरी) असे जखमीचे नाव आहे.
ही घटना रविवारी (ता. २५) सकाळी साडेसातच्या सुमारास घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ऐजाज बावनी हे दुचाकी (क्र. एमएच-०८ एसी ६) घेऊन पावसहून रत्नागिरीकडे येत असताना भाट्ये रस्त्यावर त्यांच्या दुचाकीचा ताबा सुटून ती घसरली. या अपघातात ते जखमी झाले.
अपघातानंतर त्यांना तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणाची नोंद जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या पोलिस चौकीत करण्यात आली आहे.

